कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र अखेर खानापूरलाच

05:14 PM Mar 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

विटा :

Advertisement

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा बुधवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठी सुमारे 141 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती. ही मागणी आमदार गोपिचंद पडळकर यांनीही उचलून धरली. या मागणीसाठी आंदोलन होऊन भविष्यात काही होण्यापूर्वी उपकेंद्राची घोषणा करण्याची आग्रही मागणी बाबर यांनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी घोषणा केली.

Advertisement

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपिचंद पडळकर यांनी पाँईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बाबर आणि पडळकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रही मागणी करीत उपकेंद्र खानापूर येथेच व्हावी, अशी मागणी लावून धरली.

याबाबत बाबर म्हणाले, विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, ही मागणी खूप वर्षापासून प्रलंबीत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. शिवाजी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर खानापूर येथील जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. भविष्यात आंदोलन होऊन निर्णय होण्यापेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार बाबर यांनी विधीमंडळात केली.

आमदार पडळकर यांनीही मागणी लावून धरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहंकाळ या भागातील दुष्काळ हटला आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे सांगितले. खानापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. लोक यासाठी आंदोलन, बैठका घेत आहेत. त्यामुळे जनभावनेचा विचार करून उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, आणि त्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावी, अशी मागणी केली.

त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, ही मागणी शासनाकडे आली आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने पाठवला आहे. जागेची उपलब्धता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिला आहे. यासाठी जवळपास 141 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच केवळ उपकेंद्र करून चालणार नाही, काही पदवीका आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत, यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल, अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली.

त्यानंतर आमदार सुहास बाबर आणि गोपिचंद पडळकर यांनी विधीमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी संयुक्त वार्तालाप केला. यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी आम्ही आणि आमदार गोपिचंद पडळकर यांनी विधीमंडळात मागणी केली होती. आमच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिसाद देत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठी मंजूरी दिली.

विद्यापीठ उपकेंद्रासाठी 141 कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यातून पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. खानापूरला गायरान जमीन उपलब्ध आहे. त्याचे अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. त्यांनी महत्त्वाची भूमिका घेत घोषणा केली. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असेही आमदार बाबर म्हणाले.

खानापूर घाटमाथ्यावर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, ही जुनी मागणी आहे. यासाठी विविध लोकप्रतिनिधी, सिनेट सदस्य आणि जनतेतूनही आवाज उठवला होता. खानापूरमध्ये जमिनीची उपलब्धता आहे. त्याचबरोबर खानापूर हे आटपाडी, तासगांव, कवठेमहंकाळ, कडेगांव यांच्यासह सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यालाही जवळ आहे. त्यामुळे याठिकाणी उपकेंद्र झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article