शिवाजी विद्यापीठाचा आज वर्धापन दिन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा 62 वा वर्धापण दिन आज (दि. 18) सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाने होणार आहे. सकाळी 8.45 राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला वाजता प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असतील. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तरी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक, संलग्न महाविद्यालयातील गुणवंत प्राचार्य, शिक्षक व प्रशासकीय सेवक, विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांची शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त पाल्य, बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक व प्राचार्य सुमतीबाई पांडूरंग पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव, प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. तरी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.