कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठ परिसर फुलला

01:57 PM Jul 29, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शिवाजी विद्यापीठाची जैवविविधतेचे केंद्रच म्हणून ओळख आहे. पावसामुळे 856 एकर परिसरात विविध वनस्पती फुलल्या आहेत. रंगीबेरंगी फुलांची चादर परिसरात पसरली आहे. ही जैवविविधता पाहण्यासाठी अनेक लोक विद्यापीठ परिसरात फिरत असतात. ही हिरवळ पाहून कोणाचेही मन प्रसन्न होईल, असे वातावरण आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठ परिसरात दीड हजार दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. सध्या पाऊस सुरू असल्याने या वनस्पती हिरव्यागार झाल्या आहेत.

काही वनस्पतींना रंगीबेरंगी फुले आल्याने परिसर आकर्षक दिसतो आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक लोक परिसरात फिरत असतात. विद्यापीठातील सर्व तळीही काठोकाठ भरली असून, अनेक पक्षांनी हजेरी लावली आहे.  विद्यापीठ परिसरातील पक्षांसह इतर पक्षीही या तळयांमध्ये पोहताना दिसतात. झाड, पान, फुलांनी बहरलेला विद्यापीठ परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पावसाच्या सरी येत असताना मधूनच एखादा मोर थुई थुई नाचताना दिसतो. त्यामुळे फिरायला आलेले लोक आवाज न करता या मोराला आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करताना दिसतात. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकूण एखाद्याला लागलेली तंद्रीचा भंग होतो. या शिक्षण मंदिर परिसरात दुर्मिळ वनस्पती, पक्षांचे दर्शन होत आहे.

शिवाजी विद्यापीठ परिसरातील तळी आणि विहरी काठोकाठ भरल्या आहेत. नाट्या व संगीतशास्त्र विभागाजवळील तळ्यावर सकाळपासून विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी असते. सेल्फी पॉईंटवर जावून सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. तळ्यातील पक्षी आणि मासे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून लोक समाधान व्यक्त करतात. पाऊस सुरू असताना भाषा भवन पाठीमागील तळ्यात धबधबा वाहात असतो. हा धबधबा पाहून फिरायला येणाऱ्यांचा आनंद व्दिगुणीत होतो.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article