शिवरायांचा पुतळा हटवला! हडलगेत विनापरवाना उभारलेल्या पुतळ्यावर प्रशासनाची कारवाई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनापरवाना बसवलेला पुतळा हटवल्याची घटना कोल्हापूरातील हडलगे गावात घडली आहे. प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे हडलगे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावात तील गट नंबर ६४ मध्ये विनापरवाना बसविलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करत हटवला. केंद्र शाळेसमोरच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवरायांचा पुतळा चौथऱ्यावर बसवल्याचे सकाळी सर्वांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी चि-याच्या बांधकामात चबुतरा, सिंहासनारूढ छ. शिवाजी महाराज पुतळा, लोखंडी कंपाऊंड, भगवे झेंडे लावण्यात आले होते. पण प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवत शिवरायांचा हटवला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रशासनाने बसविलेला पुतळा का हटवला अशा प्रकारचा आक्षेप नोंदवत आंदोलन सुरू केला, त्यामुळे या परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.