For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेच्या विचारांशी कटिबद्ध राहून प्रचार करणार - ऋत्विक सामंत

12:47 PM Apr 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेच्या विचारांशी कटिबद्ध राहून प्रचार करणार    ऋत्विक सामंत
Advertisement

सावंतवाडी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच किरण सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते . महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्यासाठी किरण सामंत यांनी युवतीसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले. अशी माहिती कुडाळ – मालवणचे युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी दिली . युवतीसेना व युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात या निवडणुकीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करतील असा विश्वास जिल्हा दौऱ्यावर असलेल्या किरण सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. ऋत्विक सामंत यावेळी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व युवासेना व युवतीसेना यांनी एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात रणनीती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. जिल्ह्यातील युवक, युवतींना मतदानासाठी प्रवृत्त कसे करता येईल, मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल, नरेंद्र मोदींचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत कसे पोहचवता येतील, भविष्यात संघटनेला मजबूत करण्यासाठी कोणती पाऊले उचलावी लागतील या सारख्या विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यात आले. महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी व पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी युवतीसेना व युवासेना शिवसेनेच्या विचारांशी कटिबद्ध राहून प्रचार करणार आहे असे कुडाळ – मालवणचे युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी सांगितले.यावेळी युवासेनेचे हर्षद दरे, सोनाली पाटकर संतोष नाईक , हर्षद पारकर ,स्वप्नील गावडे , मिहीर राणे ,मधुरा तुळसकर, डॉ . प्रणव प्रभु, ओंकार देसाई, नूपूर सामंत, आदित्य राणे, आधी युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.