महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वादावादी

03:51 PM Nov 20, 2024 IST | Radhika Patil
Shiv Sena Thackeray faction and Shiv Sena Shinde faction have a dispute.
Advertisement

कोल्हापूरः
कोल्हापूरात विधानसभा निवडणूक मतदानादिवशी राजकीय वातावरण तापले. शहरातील कसबा बावडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात किरकोळ वाद झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

Advertisement

कसबा बावड्यातील एका मतदान केंद्रानजिकच्या बुथजवळ ही घटना घडली. सुनिल जाधव हे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राहुल माळी हे ठाकरे गटाचे कार्यरते यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचबाची झाली.

Advertisement

घटनास्थळी आमदार सतेज पाटील यांनी तात्काळ भेट देऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पुढच्या बाजूने उचकवायचा प्रयत्न केला जात आहे. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांत राहून मतदान प्रक्रिया शांततेने पार पडू द्यावी असे आमदार पाटील म्हणाले.

दरम्यान कसबा बावड्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने आले. यावेळी मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांना दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article