शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी लांबवणीवर
Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी लांबवणीवर पडली आहे. आता तीन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. 16 अपात्रते प्रकरणी दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी दर्शवली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असेही कोर्टानं म्हटलयं.
निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा,असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.केंद्रीय निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचा निकाल दिला. याच निकाला विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांच्या त्रिसदस्यसीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
सु्प्रीम कोर्टात अध्यक्षांच्या दिरंगाईविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर जवळपास 15 ते 20 मिनिटे युक्तीवाद झाला.यासंदर्भात बोलताना अॅड सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांच्या तर्फे तुषार मेहता आणि उध्दव ठाकरे यांच्यातर्फे कपिल सिब्बल यांच्यात खडाजंगी झाली. 14 सप्टेंबरला नार्वेकरांनी जेव्हा सुनावणी घेतली त्यावेळी त्यांनी पुढील तारीख सांगितली नाही.आज कोर्टाने त्यांना पुढील तारीख आठवड्यात द्यावी असं सांगितलं.त्याचबरोबर नेमंक पुढ कस जाता येईल ते ही सांगावं अस ठणकावलं. यानुसार राहुल नार्वेकर एका आठवड्यात पुढची तारीख देतील. तसचं पुढील दोन आठवड्यात अपात्रे प्रकरणी रूपरेषा कोर्टाला कळवा यात आता दिरंगाई नको असंही खडेबोल सुनावले. कदाचित नोव्हेंबरमध्ये पक्ष आणि चिन्हाबद्दल ठोस निर्णय कळेल. तसेच अपात्रेप्रकरणी दोन आठवड्यात निश्चित माहिती समोर येईल असेही शिंदे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाचे अध्यक्षांना खडेबोल
आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन ठेवली नाही
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे
कारवाईबाबत नेमकी काय प्रगती झाली? हे अध्यक्षांनी सांगावं
असं अनिश्चित काळ काम करू शकत नाही
किती वेळात काम करणार?याचं टाईमटेबल त्यांनी द्यावं