महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीतील मंत्री केसरकरांचे बॅनर अज्ञाताने फाडले

03:45 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

केसरकर मित्रमंडळ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी दीपावली शुभेच्छा निमित्त पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी फेडरेशन व दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने 18 व 19 नोव्हेंबर या दोन दिवशी सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेही पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कुणी अज्ञाताने फाडले आहेत . त्याबद्दल सावंतवाडी पोलीस ठाण्यात दीपक केसरकर मित्र मंडळ व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे. केसरकर यांच्या विरोधात सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आपली आमदारकीची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर मंत्री केसरकर यांच्या विरोधात सध्या विरोधकांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे . आणि त्याच अनुषंगाने सावंतवाडी शहरातील शुभेच्छांचे पोस्टर फाडण्यात आले असावेत असा प्राथमिक संशय आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आज केसरकर मित्र मंडळ व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत या अज्ञाताचा शोध लावावा, अन्यथा पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# deepak kesarkar # sawantwadi
Next Article