For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा – दोडामार्ग – आयी राज्यमार्गाचे दुपदरीकरण करा

02:51 PM May 31, 2025 IST | अनुजा कुडतरकर
बांदा – दोडामार्ग – आयी राज्यमार्गाचे दुपदरीकरण करा
Advertisement

दोडामार्गातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे खासदार नारायण राणेंना निवेदन

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

बांदा – दोडामार्ग – आयी राज्यमार्ग १८६ हा रस्ता दुपदरीकरण करण्याची मागणी खासदार नारायण राणे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी भेट घेत केली. याबाबतचे एक निवेदनही त्यांनी खासदार राणे यांना दिले. दोडामार्ग तालुक्यामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ हा जात होता. परंतु काही वर्षांपूर्वी हा महामार्ग बांदा पत्रादेवी मार्गे पणजी असा करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुका रस्त्याचा दर्जा कमी झाल्यामुळे वाहतुकीच्या साधन सुविधेपासून तालुका वंचित राहतो. त्याचप्रमाणे याच रस्त्यावर आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एमआयडीसी मंजूर केलेली आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्याशी दळणवळणाचे साधन, मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे हा मार्ग उपयोगी पडणार आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे कि, सदर रस्ता बांदा – दोडामार्ग – आयी राज्यमार्ग १८६ हा रस्ता दुपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.

Advertisement

केंद्रीय सुपारी संशोधन केंद्र दोडामार्गात उभारा....

दोडामार्ग तालुक्यामध्ये सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सुपारी बागायत क्षेत्रामध्ये नवनविन प्रयोग, नविन लागवड करण्यासाठी तरुण शेतकरी उत्सुक आहेत. त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनाचा लाभ मिळण्यासाठी असे संशोधन केंद्र आवश्यक आहे. त्याची कार्यालये कर्नाटक, केरळ राज्यात आहेत. महाराष्ट्र राज्यात ते रायगड जिल्‌ह्यातील श्रीवर्धन येथे आहे. परंतु आपल्या शेतक-यांना अत्यंत दूर असल्याने आपण व्यक्तीशः लक्ष घालून केंद्रीय कृषि कार्यालय सलग्न असलेल्या सुपारी संशोधन केंद्र दोडामार्ग तालुक्यामध्ये करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, धनश्री गवस, मायकल लोबो, रेखा लोंढे, विनायक शेटये, आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.