कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साताऱ्यात शिवसेना–मनसे युतीची मोठी घोषणा ; नगरपालिका निवडणुक एकत्र लढणार

01:53 PM Oct 24, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

              सातारा नगरपालिकेत शिवसेना-मनसे युतीची ताकद एकत्र

Advertisement

सातारा : सातारा येथील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन करून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रितपणे लढण्याची घोषणा केली.

Advertisement

वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील नगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि मनसे युतीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा मनसे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आणि शहर संघटक प्रणव सावंत यांनी प्रसंगी केली.

सातारा शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मनसैनिक नेहमीच आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येऊन मार्ग काढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “सातारकर कायम आमच्या पाठीशी राहिले आहेत आणि पुढेही सातारकरांचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या सोबत राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये राहुल पवार (मनसे शहराध्यक्ष), प्रणव सावंत (शहर संघटक, शिवसेना), बाळासाहेब शिंदे (माजी शहरप्रमुख, शिवसेना), श्रीकांत पवार (माजी तालुकाप्रमुख), भरत रावळ (शहर उपाध्यक्ष, मनसे), गणेश अहिवळे (उपशहरप्रमुख, शिवसेना), रविराज बडदरे, रोहित जाधव, सुमित नाईक, शिवाजीराव इंगवले, प्रशांत सोडमिसे (शहर उपाध्यक्ष, मनसे), संदीप धुढळे (जनअधिकार सेना, मनसे शहराध्यक्ष), तसेच शाखाध्यक्ष ओंकार साळुंखे, मनोहर चव्हाण, इम्रान शेख, नयन साळुंखे, प्रदीप सावखंडे, आशुतोष पारंगे, ओंकार शिंदे आदी शिवसैनिक व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
#PoliticalAlliance#SataraElections#Shivsena#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamaharashtrapoliticssatara politics
Next Article