For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरची नेमकी नस शिवसेनेने ओळखली....

01:09 PM Nov 24, 2024 IST | Radhika Patil
कोल्हापूरची नेमकी नस शिवसेनेने ओळखली
Shiv Sena has identified the true nature of Kolhapur...
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

सर्वसामान्य कार्यकर्ते महायुतीकडे आणि नेते महाविकास आघाडीकडे..., अशा परस्पर विरोधी टोकाचा मोठा फटका कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला बसला.

महाविकास आघाडीकडे सल्ले देणाऱ्यांची खूप गर्दी होती. पण स्थानिक जनमत समजून घेणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी होती. कोल्हापुरात मंगळवार पेठेत, बुधवार पेठेत, शिवाजी पेठेत, उत्तरेश्वर पेठेत, शनिवार पेठेत, काय बोलायला पाहिजे, याचा विचार न करता देश व राज्याच्या पातळीवरच प्रचारासाठी आणलेले स्टार प्रचारक बोलत राहिले आणि कोल्हापूरवर मात्र फार कमी बोलले. त्यामुळे कोल्हापुरातल्या गल्ली-बोळाची नसच महाविकास आघाडीला अखेरपर्यंत सापडली नाही. त्यात काँग्रेसच्या उमेदवार मधुरीमाराजे यांची ऐनवेळची माघार नक्कीच काँग्रेसला नडली. आणि या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत घेत शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर व महायुतीच्या घटक पक्षांनी कोल्हापूर शहराच्या अंतरंगात म्हणजे कोल्हापुरातले गल्ली, बोळ, पेठ, तालमी, चौक, तिकटीवर मुसंडी मारली आणि त्यामुळेच महायुती विजयापर्यंत जाऊन पोहोचली.

Advertisement

यावेळच्या विधानसभा निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्या म्हणजे प्रत्येक वेळी निवडणुकीत कोणाला पाडायचे, हे ठरवून मतदान होते. कारण प्रथमच यावेळी कोणाला निवडून आणायचे, हे ठरवून मतदान झाले.

कोल्हापूर उत्तरची यावेळची निवडणूक अर्ज दाखल करण्यापासूनच संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाली. कारण काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांची उमेदवारी घोषित केली आणि या उमेदवारीला विरोधी पक्षाऐवजी काँग्रेसमधूनच विरोधात सुरुवात झाली. आपण म्हणू ते कोल्हापूर.., आपण म्हणू तो उमेदवार.., अशा भ्रमात असलेल्या काँग्रेस मधल्या काही जणांनी या उमेदवारीला विरोध केला. एवढा विरोध की काँग्रेस कमिटीवर दगडफेक करून राडा केला. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. लाटकरांची उमेदवारी उमेदवारी बदलली.

अन् उमेदवारीची माळ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या सुनबाई मधुरिमाराजे यांच्या गळ्यात घातली गेली. अर्ज भरण्यासाठी जंगी मिरवणूक निघाली. आता राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात बलाढ्या उमेदवार मिळाला, असे वातावरण तयार झाले. पण घडले वेगळेच.

मधुरिमाराजेंनीच ऐनवेळी माघार घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सतेज पाटील यांनी ‘दम’ शब्दाचा वापर करत आपली संतापाची भावना व्यक्त केली. राज्यभर ही भावना या मोबाईलवरून त्या मोबाईलवर फिरत राहिली आणि आता काँग्रेसला उमेदवार म्हणून पुन्हा राजेश लाटकर यांच्या गळ्यात बोलावून माळ घालावी लागली. काँग्रेसमधल्या या दुफळीची, या विसंगतीची कोल्हापूरकरांनी मात्र घ्यायची ती दखल व्यवस्थित घेतली. याउलट राजेश क्षीरसागर व महायुतीचे सर्व घटक पक्ष जोमात निवडणुकीत उतरले. कसबा बावड्यात लाटकर यांना भरपूर मतदान होईल, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात लाटकर यांना कमी मतदान झाले व तेथूनच क्षीरसागर निवडून येणार, हे स्पष्ट झाले. आणि झालेही तसेच.

कोल्हापुरातल्या म्हणजे मूळ कोल्हापुरातल्या गल्ली, बोळ, पेठ, चौक, तिकटीवर राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी दणकून राजेश क्षीरसागर यांना मतदान केले. आदल्या रात्री अनेकांनी याचे पंधराशे, त्याचे दोन हजार.., अशा शब्दांचे खेळ अनुभवले. हे नेते असे रात्री दानशूर कसे होतात, हेही पाहिले. पण काही असो क्षीरसागर यांनी मैदान मारले. राजेश लाटकर आणि नक्कीच झुंज दिली. पण प्रस्थापितांना डावलून एखाद्या साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर ठराविक प्रस्थापितांच्या पोटात कसे दुखते? त्यांना कसे मळमळते? हे शल्यही आयुष्यभर लक्षात येईल, अशा पद्धतीने लाटकर यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवले.

Advertisement
Tags :

.