पाटकुल येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
पाटकुल (प्रतिनिधी) – सुहास परदेशी
मोहोळ कडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकी नवीन चेहरा आहे .भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून मिळवा निधी उपलब्ध होईल त्यामुळे कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही . सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, मोहोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करू जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले. मंत्री गोगावले हे रविवार दि १४ रोजी मोहोळ तालुक्यातील पाटकुल दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पाटकूल येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.