For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाटकुल येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

05:43 PM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाटकुल येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
Advertisement

पाटकुल (प्रतिनिधी) – सुहास परदेशी

Advertisement

मोहोळ कडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकी नवीन चेहरा आहे .भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून मिळवा निधी उपलब्ध होईल त्यामुळे कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही . सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, मोहोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करू जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले. मंत्री गोगावले हे रविवार दि १४ रोजी मोहोळ तालुक्यातील पाटकुल दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पाटकूल येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार राजू खरे म्हणाले, मला मोहोळ मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी २०० रस्ते करण्याची संधी द्यावी व त्यास मंजुरी द्यावी. मतदार संघात आज ही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकरी जर शेतातून गावात आला , गावातून तालुक्याला आला , तालुक्यातून जिल्ह्याला आला , तरच त्याला सर्व गोष्टी समजणार आहेत त्यासाठी रस्ते खूप आवश्यक आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख चरणराव चवरे म्हणाले, मोहोळ तालुक्यात जी विकास कामे झाली आहेत ती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले व आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून झाली आहेत.पेनुर व पाटकुल ची नाळ कायमच जोडली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व शाश्वत पाणीपुरवठ्या साठी १४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. आमदार खरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका होतील .जिल्हा परिषदेला मला संधी मिळाली तर विकास काय असतो ते दाखवून देऊ. यावेळी टाकळी सिकंदर , पाटकुल , पेनुर आदींसह शेजारील अन्य गावातील ग्रामस्थ व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.