महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसेनेचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

11:26 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीमाप्रश्नाच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या शिवसेनेचे योगदान महत्त्वाचे असल्याने सीमाभागात उत्साहात वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात मुख्य कार्यक्रम पार पडला. शिवसेनेचे कोल्हापूरचे पदाधिकारी प्रभाकर खांडेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर, सचिन गोरले, दत्ता पाटील, महेश टंकसाळी, विनायक बेळगावकर, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

शिवसेनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त वह्यावाटप

Advertisement

बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 29, 20 व 22 येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, पेन यासह इतर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहरप्रमुख राजू तुडयेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक जी. एल. जैनोजी, एन. एस. कुरबेट, एस. यु. कपिलेश्वरी यांच्याकडे शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, युवा सेनेचे विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, संकेत कडगावकर, संकेत कंग्राळकर, सक्षम कंग्राळकर यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

खडेबाजार येथे शिवसेना वर्धापन दिन

शिवसेना सीमाभाग व आर्यन फाऊंडेशनच्यावतीने शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. आर्यन फाऊंडेशनचे संस्थापक हणमंत मजुकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अमोल मजुकर, रमेश पाटील, अशोक देसाई, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, संजू नाकाडी, शंकर गुरव यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article