शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावच्यावतीने यावर्षीही ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1946’ या हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे प्रेरणा मंत्राने सुऊवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हार घालून आरती करण्यात आली. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पालखीत मूर्ती व ग्रंथ स्थानापन्न करून पालखी पूजन करण्यात आले. श्री छत्रे गुऊजींच्या हस्ते ध्वज चढवून पूजन करण्यात आले. त्यानंतर देवदर्शन यात्रेला सुऊवात झाली. या यात्रेत प्रारंभी ध्वज, नंतर नामदेव भजनी मंडळ शहापूर, ज्ञानेश्वरी भजनी मंडळ धामणे-वडगाव, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ सुळगा या वारकरी सांप्रदायांच्यावतीने भजन-कीर्तन सादर करण्यात आले.
श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर असा देवदर्शन यात्रेचा मार्ग होता. यात अनेक धारकरी, शिवभक्त भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. महिला वर्गाचाही विशेष सहभाग होता. ही यात्रा कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसारच साजरा केला पाहिजे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावर झाला. त्यानंतर महाराज देवदर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिराला गेले. त्याच धर्तीवर आदरणीय भिडे गुऊजींच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिनाच्या पूजेनंतर देवदर्शन यात्रेचे नियोजन केले आहे, असे प्रतिपादन प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी केले. कपिलेश्वर मंदिर येथे महादेवाची आरती करून ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिवभक्तांसाठी प्रसादाचे वाटप केले.
यावेळी शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, वडगाव-अनगोळ विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विजय कुंटे, प्रमोद चौगुले, प्रफुल्ल शिरवळकर, सदाभाऊ जांगळे, गणेश जांगळे, माऊती पाटील, गजानन पवार, अंकुश केसरकर, गिरीश पाटील, आनंद कांबळे, चंद्रशेखर चौगुले, अमोल केसरकर, अभिजीत अष्टेकर, राम सुतार, अतुल केसरकर, संतोष कुसाणे, प्रवीण घागवे, शिवाजीराव मंडोळकर, नामदेव पिसे, विलास चौगुले, युवराज पाटील, विनायक कोकितकर, अजित जाधव, राहुल कुरणे, बाळू गुरव, नागराज सावंत, दौलत जाधव, मोहन जुई, परशुराम पाटील, संदीप पाटील, प्रमिला पाटील, रेखा चौगुले, सुलोचना शिनोळकर, इशा निलजकर, विद्या पाटील, रीना केसरकर, पूजा किणीकर तसेच तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शिवभक्त, महिलावर्ग व बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते.