For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात

10:10 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात
Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये गुऊवारी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त काही ठिकाणी शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्मयाच्या बहुतांशी गावच्या वेशीवर, मध्यभागी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर प्रत्येकामध्ये एक नवचैतन्य निर्माण होते. त्यामुळेच शिवरायांच्या मूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत. काही गावांमध्ये गुऊवारी 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त तऊणांमध्ये उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला.

मच्छे शिवतेज युवा संघटना

Advertisement

मच्छे गावातील शिवतेज युवा संघटना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा मच्छे व बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छे येथील पाटील गल्ली व लोहार गल्ली येथे असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळ शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक करून पूजन करण्यात आले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सध्याच्या तऊण पिढीने समजून घेतला पाहिजे. शिवरायांचे आचार व विचार साऱ्यांनीच आत्मसात केले पाहिजेत, असे बाल शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष संतोष जैनोजी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी शिक्षक विनायक चौगुले व कृष्णा अनगोळकर यांचीही शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित व तऊणांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. याप्रसंगी विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या तऊणांचा व महिलांचा विविध प्रकारची रोपटी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सागर कणबरकर यांनी केले. गजानन छप्रे, बजरंग धामणेकर आदींसह शिवतेज युवा संघटनेचे कार्यकर्ते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व कार्यकर्ते व बाल शिवाजी वाचनालयाचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

राकसकोप येथे शिवरायांच्या मूर्तीचा आठवा वर्धापन दिन

राकसकोप येथे शिव राज्याभिषेक सोहळा व गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आठवा वर्धापन दिन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम गुऊवारी साजरा करण्यात आला. गावातील काही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजाअर्चा व महाआरती झाली. उपस्थित सर्वांसाठी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.