For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवप्रताप दिन साजरा

11:51 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवप्रताप दिन साजरा
Advertisement

शिवप्रताप दिनी मातृ-पितृ इच्छापूर्ती दिन म्हणून आचरण : छत्रपती शिवाजी उद्यानात कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी गुरुवार दि. 27 रोजी शिवप्रताप दिन मातृ-पितृ इच्छापूर्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख आनंद चौगुले यांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. तसेच शिवरायांची आरती करण्यात आली. स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानचा छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढून वध केला व अफझलखानच्या रुपाने आलेले संकट दूर केले. अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून समस्त शिवभक्त शिवप्रताप दिन साजरा करतात. आपल्या वडिलांच्या अपमानाचा सूड व आईच्या इच्छेची पूर्तता म्हणून शिवरायांनी अफझलखानचा वध केला.

हा दिवस संभाजी भिडे गुरुजींनी मातृ-पितृ इच्छापूर्ती दिवस म्हणून साजरा करण्याची सूचना केली. त्यानुसार तो साजरा करण्यात येत आहे. भगवा ध्वज व अफझल वधाचे चित्र लावून छत्रपती शिवाजी उद्यान ते अंबाबाई देवस्थानपर्यंत फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित धारकऱ्यांना प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी मार्गदर्शन केले. या काळात शिवचरित्र पारायणाचे आयोजन गल्लोगल्ली करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. तालुकाप्रमुख परशराम कोकीतकर, अनगोड-वडगाव विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विभागप्रमुख प्रमोद चौगुले, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, अमोल केसरकर, मारुती पाटील, प्रफुल्ल शिरवलकर यांच्यासह इतर शिवभक्त उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.