कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिव नाडरकडून मुलीला मोठे गिफ्ट

06:06 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

47  टक्के हिस्सेदारी केली नावे

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

एचसीएलचे संस्थापक आणि अब्जाधिश शिव नाडर यांनी आपली मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा हिला एचसीएल कॉर्प आणि वामा सुंदरी इन्वेस्टमेंट दिल्लीतील आपली 47 टक्के हिस्सेदारी भेट म्हणून देऊ केली आहे. यायोगे आता रोशनी नाडर मल्होत्रा या देशातील तिसऱ्या नंबरच्या श्रीमंत व्यक्ती बनल्या असून दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी हिस्सेदारी असणाऱ्या समभागधारक झ्ा़ाल्या आहेत. वामा दिल्लीमार्फत ठेवण्यात आलेली 12.94 टक्के हिस्सेदारी आणि एचसीएल कॉर्पमार्फत ठेवलेली 49.94 टक्के हिस्सेदारीच्या संबंधात एचसीएल इन्फोसिस्टममध्ये मतदानाचा अधिकार त्यांना मिळालाय. शिव नाडर यांनी 6 मार्च 2025 रोजी मुलगी रोशनी मल्होत्रा यांना भेटीदाखल (गिफ्ट डीड) हस्ताक्षरासह हिस्सेदारी हस्तांतरीत केली आहे.

आशा वाढल्या

ही हिस्सेदारी प्राप्त केल्यानंतर एचसीएल कॉर्पचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. कंपनीच्या विकासाला अधिक मजबुती प्राप्त होणार आहे. ही भेट हस्तांतर होण्याआधी वडील आणि मुलगी यांच्याकडे वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्पमध्ये अनुक्रमे 51 टक्के, 10.33 टक्के हिस्सेदारी होती. रोशनी नाडर एचसीएल टेकच्या चेअरपर्सन आहेत. जुलै 2020 मध्ये रोशनी यांनी जबाबदारी घेतली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article