महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहापूर-वडगावमध्येही होणार पारंपरिकरीत्या शिवजयंती

10:09 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक साजरी केली जाते. बेळगावसोबतच शहापूर विभागातही 9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती तर 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंडळांनी शिवचरित्रावर आधारित देखावे करण्याच्या तयारीला सुरुवात करावी, असा ठराव शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत केला. मंगळवारी साईगणेश सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव परिसरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. 9 मे रोजी सकाळी 9.30 वा. शहापूर महामंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. दि. 11 रोजी बॅ. नाथ पै चौक, शहापूर येथे व्यासपीठ उभारून चित्ररथांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. शहापूर, वडगाव परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवजयंती थाटात साजरी करावी, काही अडचणी असल्यास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे नेताजी जाधव यांनी सांगितले. रणजित हावळाण्णाचे, संजय शिंदे, राजकुमार बोकडे, पी. जे. घाडी, प्रकाश हेब्बाजी, विजय भोसले, ज्ञानेश्वर मण्णूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव श्रीकांत कदम यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article