For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरपीडी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात

10:49 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरपीडी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष : प्रा. अनिल चौधरी

Advertisement

बेळगाव : येथील एसकेई संस्थेच्या आरपीडी कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती व 350 वे राज्याभिषेक वर्ष महोत्सव कॉलेजच्या पद्मभूषण पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनिल चौधरी उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे अनेक पैलू उलगडून त्यातील बारकावे स्पष्ट केले. महाराजांनी कठीण प्रसंगी आपल्या सरदारांना युद्धाला न पाठवता स्वत: आघाडीवर लढले. नीतिमान राजा म्हणून विश्वभर अमर लौकिक प्राप्त केला, असे ते म्हणाले. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिन्दी विभाग प्रमुख व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. अनिल चौधरी, एसकेई संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर, संस्थेच्या पदाधिकारी बिंबा नाडकर्णी, लता कित्तूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, उपप्राचार्य एम. एस. कुरणी, पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता बिजापुरे, प्रा. एस. एस शिंदे या मान्यवरांनी केले. बेनकनहळ्ळी येथील शंभूराजे क्रीडा मंडळाच्या मल्लखांब, दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी यांची प्रात्यक्षिके सूरज देसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. महाविद्यालयाची विद्यार्थिनी माधुरी बागवे हिने शिवमंत्र, श्वेता कणबरकर आणि पूनम खोराटे यांनी पोवाडा सादर केला. प्रा. परसू गावडे यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.