For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 11 मे रोजी

11:27 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 11 मे रोजी
Advertisement

9 मे रोजी शिवजयंती : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्यदिव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही 9 मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून 11 रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. शिवप्रेमी व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात करावी, असा निर्णय रविवारी आयोजित मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीला शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी चित्ररथ मिरवणुकीवेळी आचारसंहिता असल्याने मिरवणूक केव्हा होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. महिनाभरापूर्वी पासून कार्यकर्ते शिवजयंतीच्या तयारीला लागतात. त्यामुळे शिवजयंतीबाबतचा निर्णय लवकर घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. रविवारी बैठक आयोजित करून मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने आपली भूमिका जाहीर केली आहे.

गुरुवार दि. 9 मे रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे विविध मंडळांच्या शिवज्योतींचे स्वागत केले जाणार आहे. तर सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे शिवमूर्तीचे पूजन व आरती, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवमूर्तीचे पूजन केले जाणार आहे. शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी 105 वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तसेच यावर्षी शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाला 400 वर्षे पूर्ण होणार असल्याने त्यावेळीही विशेष कार्यक्रम व मिरवणूक आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. शिवराज पाटील यांनी मागील वर्षीचा जमा-खर्च सादर केला. तसेच जुन्याच कार्यकारिणीला यावर्षीही मंजुरी देण्यात आली. यावेळी रणजित चव्हाण-पाटील, विजय पाटील, रमाकांत कोंडुस्कर, अंकुश केसरकर, मदन बामणे, शुभम शेळके, राजू मरवे, बाबू कोले, गणेश द•ाrकर, रणजित हावळाण्णाचे, विनोद आंबेवाडीकर यांच्यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.