For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

12:18 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष : ठिकठिकाणी व्याख्यानांचे आयोजन : गावागावांमध्ये भगवेमय वातावरण

Advertisement

वार्ताहर/किणये 

तालुक्यात मंगळवारी परंपरेनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी... असा जयघोष कार्यकर्त्यांनी केला. गावागावांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ व चौकांमध्ये भगवे ध्वज लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

तालुक्याच्या अनेक गावांमध्ये गावच्या वेशीत, चौकात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच गावांमध्ये सध्या रोज शिवभक्त पहाटे आरती व पूजा करत आहेत. सावगाव येथील शिवस्मारक येथे शिवस्मारक सेवा समिती व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने शिवजयंती परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून नित्यपूजा करण्यात आली. यानंतर महिलांनी पाळणागीत म्हटले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला गावातील तरुण कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लक्ष्मी गल्ली, हलगा

लक्ष्मी गल्ली, हलगा येथे शिवसेना श्री शिवजयंती युवक मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाळणागीत म्हटले. या कार्यक्रमाला गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राकसकोप येथे शिवजयंती

राकसकोप गावात परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. केदारी मोटार, संजय मोरे, मोहन पाटील, धाकलू पाटील, मनोहर बेळगावकर, काशिनाथ मोरे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाळणागीत म्हणून महाआरती करण्यात आली. यावेळी परशराम किणेकर, परशराम मोटर, दिलीप पाटील, राहुल कंग्राळकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारुती गल्ली, मच्छे

मारुती गल्ली, मच्छे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन करण्यात आले. महिलांनी पाळणागीत म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचारविचार तरुणांनी आत्मसात केले पाहिजे, असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले. किणये, बाळगमट्टी, बिजगर्णी,बेळगुंदी, बेळवट्टी, पिरनवाडी, देसूर, जानेवाडी, नावगे, वाघवडे आदी गावांमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी केली.

Advertisement
Tags :

.