For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघातर्फे शिवजयंती

11:16 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघातर्फे शिवजयंती
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक व उत्तराधिकारी संघातर्फे स्वातंत्र्यसैनिक भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शतायुषी स्वातंत्र्यसैनिक व संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. प्रास्ताविक संघाचे संचालक एस. के. पाटील यांनी केले. सदस्य संजीव जाधव, अरुण देसाई व विवेकानंद पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी किरण बेकवाड, बाळाप्पा लोहार, शंकर गिरी, प्रकाश अष्टेकर, वर्धमान मरेन्नवर, कर्मचारी लता चौगुले, मंजुनाथ चिकोर्डे व दीपक जोई आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.