अविनाश साबळेसह 47 जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
प्रदीप गंधे यांना जीवन गौरव : महाराष्ट्रातील दिग्गज क्रीडारत्नांचा होणार सन्मान
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा स्टार धावपटू अविनाश साबळेला 2022-23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारने गुरुवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केले. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून अविनाशने इतिहास घडवला होता. पदक जिंकता आले नसले तरी अविनाशने नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. आता राज्य सरकारने त्याला पुरस्कार जाहीर केला आहे. याशिवाय, 2022-23 चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे. 1982 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गंधे यांनी मिश्र दुहेरीत आणि पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती.
याशिवाय, राज्य सरकारने आज उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकलग देण्यात येणारे जिजामाता पुरस्कार जाहीर केले. हा पुरस्कार पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), अनिल घाटे (कब•ाr), राजाराम घाग (दिव्यांग खेळांचे मार्गदर्शक अॅक्वेटीक्स), दिनेश लाड (क्रिकेट), शुभांगी रोकडे (तिरंदाजी), सुमा शिरुर (पॅराशूटींग) यांना जाहीर झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने अविनाश साबळेसह 47 जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबई व पुणे येथील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, नागपूर येथील खेळाडूंना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते (2022-23)
अविनाश साबळे, दीप रामभीया, आदित्य मेहता, संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, निलम घोडके, आदित्य मित्तल, शुशिकला दुर्गा प्रसाद आगाशे, प्रतिक पाटील, काशीश दिपक भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, रुपाली गंगावणे, अक्षय तरळ, रुचिता विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, शाहू माने, श्रेयस वैद्य, दिया चितळे, श्रुती कवड, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वा पाटील, अंकिता जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्र यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीकांत निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे.
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (2022-23)
कस्तुरी दीपक सावेकर (कोल्हापूर), जयंत दुबळे (नागपूर)
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू 202-23).
अफ्रिद अत्तार (जलतरण, कोल्हापूर), अन्नपूर्णा कांबळे (अॅथलेटिक्स, कोल्हापूर), निलेश गायकवाड, अनिता चव्हाण, लताताई उमरेकर, प्रियेशा देशमुख, नताशा जोशी, प्रांजली धुमाळ.