For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shirala : शिराळा नगरपंचायत आरक्षण जाहीर; काहींना धक्का, तर काहींचा जल्लोष

01:18 PM Oct 09, 2025 IST | NEETA POTDAR
shirala   शिराळा नगरपंचायत आरक्षण जाहीर  काहींना धक्का  तर काहींचा जल्लोष
Advertisement

        शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण

Advertisement

शिराळाशिराळा नगरपंचायत निवडणूकीसाठी १७ प्रभागमधील आरक्षणामध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती युवकांची झाली असून दोन वर्षांपासून अनेकजण पुर्वीच आरक्षण पुन्हा पडणार नाही. यावेळी निवडणुकीच्या तयारीला लागले होते. परंतु बहुतांश प्रभागात गत पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण पडल्यामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला.

बहुतांश दावेदारांच्या दांड्या गुल झाल्या. तर नगराध्यक्षपद खुले असल्याने नगराध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण होणार हे मात्र नक्की आहे. शिराळा येथील तहसिल कार्यालयात उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, अभियंता संजीव जाधव यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण झाली.

Advertisement

शिराळा शहराचा विस्तार पाहता प्रभाग संख्या वाढली पाहिजे होती. परंतु जुन्या लोकसंख्या नुसार सतरा प्रभाग कायम करण्यात आले आहेत.यामध्ये सर्वसाधारण १०, अनुसूचीत जाती २. तर नागरिक मागास ५ आहेत यामध्ये महिला आहेत. शिराळा प्रभाग १ सर्वसाधारण असून लोकसंख्या ८४९ आहे. तर प्रभाग २ हा सर्वसाधारण महिला असून लोकसंख्या ९०० आहे.

तसेच प्रभाग ३ हा सर्व साधारणसाठी असून या प्रभागात १०१२ लोकसंख्या आहे. प्रभाग ४ हा सर्व साधारण साठी राखीव असून लोकसंख्या ८६३ आहे. प्रभाग ५ सर्व साधारण महिला लोकसंख्या ९०४ आहे. तर प्रभाग ६ हा नागरिक मागास प्रवर्ग महिला राखीव आहे लोकसंख्या ८६८ आहे. याचबरोबर प्रभाग ७ हा ही नागरिक मागास प्रवर्ग महिला साठी राखीव आहे.

लोकसंख्या ८३३ आहे. तर प्रभाग ८ डा नागरिक मागास प्रवर्ग साठी राखीव आहे लोकसंख्या ८९९ ९ नंबरचा प्नारभ हा नागरिक मागास प्रवर्ग महिला राखीव साठी राखीव आहे. लोकसंख्या ८९८ प्रभाग १० सर्व साधारण महिला यांची लोकसंख्या ९६६ आहे तसेच ११ हा सर्व साधारण महिला लोकसंख्या ९४५, तर प्रभाग क्रमांक १२ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून याची लोकसंख्या ८३२ आहे.

प्रभाग १३ हा सर्व साधारण महिलांसाठी असून लोकसंख्या ८७२ आहे. प्रभाग १४ हा सर्वसाधारण आहे लोकसंख्या १००३ आहे. प्रभाग १५ हा सर्व साधारण स्त्री साठी राखीव आहे लोकसंख्या १००९ आहे. प्रभाग १६ हा अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे. लोकसंख्या १००९ आहे तर प्रभाग १७ हा नागरिक मागास प्रवर्ग साठी आहे. लोकसंख्या १००३ आहे.

यावेळी माजी नगरसेवक केदार नलवडे, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, अशोक गायकवाड, लालासो तांबीट, वसंत कांबळे, सचिन नलवडे, अशोक गायकवाड, विरेंद्र पाटील, अभिजित शेणेकर, लल्या मुजावर, बाबासो कदम, अविनाश खोत, संजय हिरवडेकर, वाशिम मोमीन, बसवेश्वर शेटे, मोहन जिरंगे, आदी माजी नगरसेवक उपस्थित होते. तर ऋग्वेद काटकर, श्रावणी कुमठेकर, राजवीर देसाई, या विद्यार्थ्यांनी चिठ्या काढल्या.

Advertisement
Tags :

.