2022 मध्ये स्मार्टफोन्सची शिपमेंट वाढणार
सायबर मीडिया रिसर्चचा अहवाल : सॅमसंगची सरशी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2022 मध्ये 170 दशलक्ष स्मार्टफोनची शिपमेंट होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ भारतामध्ये 5 जी मोबाईलच्या पुरवठय़ामध्ये तीनशे टक्के इतकी वाढ वर्षाच्या आधारावर होईल असेही सांगितले जात आहे. या शिपमेंटमध्ये सॅमसंग ही कंपनी आघाडीवर राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.
पहिल्या तिमाहीमध्ये 5 जी गटामध्ये मोबाइल पुरवठय़ात सॅमसंगने 23 टक्के इतका वाटा उचलला आहे. यामध्ये आज अफोर्डेबल स्मार्टफोनची शिपमेंट ही कमी झाली असून प्रीमियम गटातील स्मार्टफोन्स ज्यांची किंमत पंचवीस हजाराच्या पुढे आहे अशांची शिपमेंट 58 टक्के वाढली आहे. सायबर मीडिया रिसर्च यांनी केलेल्या एका पाहणीमध्ये वरील माहिती उघड करण्यात आली आहे. भारतातील मोबाइल हँडसेट बाजारातील एकंदर आढावा या संस्थेने नुकताच घेतला आहे.
स्मार्टफोन कंपन्या अडचणीत
स्मार्टफोन उद्योगांना सध्या अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा झाल्याने स्मार्टफोन निर्मितीमध्ये कंपन्यांना अडचणी जाणवत आहेत. यावर मात करण्यासाठी कंपन्या विविध पर्यायांचा शोध घेताना दिसत आहेत. या वर्षाचे पहिले दोन महिने जवळपास थंडच होते असेही निरीक्षणातून दिसून आले आहे.
ऍपल्स फोन्सचा पुरवठा अधिक
पहिल्या तिमाहीमध्ये ऍपल कंपनीने शिपमेंटमध्ये 20 टक्के इतकी वाढ नोंदली आहे. 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या त्यांच्या स्मार्टफोनचा वाटा हा 77 टक्के अधिक राहिला आहे. टू जी फीचर फोन्स आणि 4 जी फीचर फोन्सचा वाटा अनुक्रमे 40 टक्के 50 टक्के वर्षाच्या पातळीवर घटला आहे.