महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिंदे गटाचे 12 आमदार ठाकरेंच्या गळाला ? असिम सरोदे यांचा दावा; कोल्हापूरातील आमदाराचाही समावेश

03:28 PM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Asim Sarode claim
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वकिल अॅड. असिम सरोदे यांनी केला असून लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी शिंदे गटाचे 12 आमदार हे ठाकरे गटाकडे परतणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. चंद्रपुर येथे निर्भय बनो या कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे. या आमदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचाही समावेश असल्याचा दावा केला आहे.

Advertisement

त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असली तरी ठाकरे गटाकडून अजूनही या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही.
तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणूकांची आचारसंहिता काही तासांतच जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये देशभरामध्ये निवडणूकांच्या तयारीसाठी राजकिय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आले. उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राभरात जाहीर सभा घेऊन भाजपसह विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडले आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आता टिकेला पोहोचला असून त्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज आहेत असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात आहे. विशेषता शिंदे गटातील आमदार हे भाजपच्या भुमिकेवर नाराज आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, ठाकरे गटाचे वकिल अॅड. असीम सरोदे हे लेखक विश्वंभर चौधरी यांच्याबरोबर राज्यभरामध्ये दौरे करून "निर्भय बनो"अशा प्रकारचा जाहीर कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमात असिम सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांची एक यादीच वाचून दाखवताना हे आमदार ठाकरे गटाकडे परत येण्यासाठी आग्रही असल्याचा दावा केला आहे.
Shinde group MLA Uddhav Thackeray Asim Sarode claim MLA Kolhapur
अॅड. सरोदे यांनी जारी केलेल्या नावांमध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास वानगा, चोपडाच्या आमदार लता सोनवणे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, माघाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोल येथील चिमणराव पाटील, बाळापूरचे नितीशकुमार तळे औरंगाबादचे आमदार प्रदिप जैस्वाल. कन्नडमधून उदयसिंग राजपूत, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची नावे आहेत . असीम सरोदे यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राज्यात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी ठाकरे गटाकडून या गोष्टीला अजूनही दुजोरा मिळालेला नाही.

Advertisement
Tags :
CM shindekolhapurmlaShinde group
Next Article