कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहलगाम गोळीबारात शिमोग्यातील रियल इस्टेट व्यावसायिकाचा मृत्यू

12:17 PM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिमोग्याचे रहिवासी : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अधिकाऱ्यांचे पथक काश्मीरला रवाना

Advertisement

बेंगळूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून या घटनेत शिमोग्यातील रियल इस्टेट व्यावसायिक मंजुनाथ यांचा मृत्यू झाला. रियल इस्टेट व्यावसायिकाची पत्नी व मुलगा सुखरुप आहेत. रस्त्याकडेला भेळपुरी खात असताना तुमचा धर्म कोणता अशी विचारणा करत दहशतवाद्याने गोळीबार केला, असे मृताची पत्नी पल्लवी हिने सांगितले. घटनेविषयी समजताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अधिकाऱ्यांचे पथक काश्मीरला रवाना झाले आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले मंजुनाथ हे शिमोग्याच्या विजयनगर येथील रहिवासी होते. पत्नी पल्लवी व आठ वर्षांच्या मुलासोबत ते 19 एप्रिल रोजी काश्मीरला गेले होते.

Advertisement

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका महिलेने ‘आम्ही भेळपुरी खात असताना एका बंदूकधारी व्यक्तीने माझ्या पतीला तुझा धर्म कोणता? अशी विचारणा केली. नाव ऐकून त्याने गोळीबार केला’, असे म्हटले आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या महिलेने मदतीची याचना केली. परंतु, कोणीही मदतीला धावून आले नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. घटनेमुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांच्या एका पथकाला काश्मीरला रवाना होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयपीएस अधिकारी चेतन आर. यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांचे पथक काश्मीरला रवाना झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article