For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेटे स्पर्धेत शर्विल,साक्ष्या विजेते

11:08 AM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
टेटे स्पर्धेत शर्विल साक्ष्या विजेते
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना आायोजित विनया कोटियन मेमोरियल राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शर्विल करंबेळकरने आर्यन मेननचा 3-2 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दिपक यकुंडी, यशोधरा कोटीयान, दिपक कोटियान, प्रविण कुमार, शैलेजा भिंगे, किरण पाटील, राजेद्र मोतीमठ, संजय, संगम बैलुर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. लहान मुला-मुलीच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत आर्यन मेननने प्रणव कन्ननचा 11-13, 11-8, 11-9, 11-9 असा पराभव केला.अथर्व चेतन मूर्तीने मुकुंद रावचा 11-8, 11-7, 11-4 असा पराभव केला.ध्रुव मुंजीने पूरब बिस्वासचा 11-8, 8-11, 14-12, 11-7 असा पराभव केला. शर्विल करंबेळकरने कृष्णा मौदगल्याचा 11-8, 17-15, 11-7 असा पराभव केला.

Advertisement

उपांत्य फेरीत आर्यन मेननने अथर्व चेतन मूर्तीचा 12-10, 11-7, 11-4 असा तर दुसऱ्या उपांत्य फेरीत शर्विल करंबेळकरने ध्रुव मुंजीचा 11-4, 11-3, 11-5 असा पराभव केला. अंतिम सामन्यात शर्विल करंबेळकरने आर्यन मेननचा 9-11, 11-3, 12-10, 9-11, 11-4 असा पराभव करुन विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात-उपांत्यपूर्व फेरीत साक्ष्या संतोषने सुची मशालचा 11-4, 11-7, 11-4 असा पराभव केला. सानवी रावने सामनवी जहागीरदारचा 11-9, 11-8, 4-11, 11-8 असा पराभव केला. सामनवी कटांबळेने तमन्ना नेरलाजेचा 10-12, 11-7, 6-11, 11-7, 12-10 असा पराभव केला. नंधाना बंदीने इशान्वी अरविंदाचा 11-7, 11-7, 11-9 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत  साक्ष्या सानवी  रावचा 11-9, 12-10, 11-3 असा पराभव केला. नंधान बंदीने सामनवी कटांबळेचा 11 - 9 , 5 - 11 , 11 - 6 , 11 - 8 असा पराभव केला. अंतिम सामन्यात साक्ष्या संतोषने नंधान बंदीचा 11-9, 11-9, 11-8 असा पराभव विजेतेपद पटकाविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.