For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेखर निकम निवडून येणार अन् मंत्रीही होणारः म्हात्रे

12:20 PM Nov 11, 2024 IST | Radhika Patil
शेखर निकम निवडून येणार अन् मंत्रीही होणारः म्हात्रे
Shekhar Nikam will be elected and will also become a minister: Mhatre
Advertisement

चिपळूण : 
आमदार शेखर निकम यांनी गेल्या पाच वर्षात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रात भरीव कार्य केलेले असून त्यांचा नावलौकीक आहे. ते प्रेमळ, गोड आणि सर्वानाच हवेहवेसे वाटणारे असे व्यक्तीमत्व असून तो एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहता या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असून फक्त मताधिक्य किती, हे मोजायचे बाकी आहे. त्यामुळे निकम हे निवडून येणारच आणि मंत्रीही होणार, असे प्रतिपादन कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रविवारी येथे केले. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ शिक्षक आमदार महात्रे हे चिपळूण, संगमेश्वरच्या दौऱ्यावर आले आहेत.

Advertisement

रविवारी सावर्डे येथे निकम यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांनी निकम यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी म्हात्रे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून शिक्षकांच्या बऱ्याच समस्या सोडवण्यात आल्या आहेत टप्पा अनुदान, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना गणवेश, सुमारे १,१६० कोटींचा पहिला उमा लगेचच दुसरा टप्पा अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. यापुढेही युतीचेच सरकार येणार, हे निश्चित आहे.

आमदार शेखर निकम यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचा विजय निश्चित आहे. अनुदानित, विनाअनुदानित सगळे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी शेखर सरांच्या नक्कीच पाठीशी राहतील, असा विश्वास वाटतो. या वेळेला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, महाराष्ट्र निवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आकाराम महिंद, टीडीएसचे दापोली तालुकाध्यक्ष संभाजी कोडीकिरे, सावर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे सचिव महेश महाडिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.