फसवणूकप्रकरणी शेखला चार दिवसांची कोठडी
कोल्हापूर :
विवाह जुळवणाऱ्या सोशल मिडीयावरील वेबसाईटवरून माहिती घेवून लखोबा लोखंडे फिरोज शेख महिलांशी संपर्क साधायचा. आपल्या मधाळ बोलण्यातून तो महिला आणि तऊणींच्यावर भुरळ पाडायचा. अत्याचार कऊन पैसे दागिणे उकळल्यानंतर मला ब्रेन ट्युमर झाला आहे. आयुष्य खूप कमी आहे. माझ्याशी लग्न करून तुला पश्चाताप करावा लागेल, असे सांगून इमोशनल ब्लॅकमेल करून तो महिलांशी संबंध तोडत होता. अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. जुना राजवाडा पोलीसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीसांनी ठकसेन शेखकडे कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मंगळवारी फिर्यादी पिडीत महिलेस बोलवून माहिती घडल्या प्रकाराची घेतली. यावेळी पिडीत महिलेने शेख याचे कारनामे पाहून पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. माझी फसवणूक का केलीस, असा जाब पिडीतेने शेखकडे बघून विचारला. तसेच शेख हा विवाहित त्याला दोन मुले आहेत. तरीसुध्दा तो गेल्या दहा वर्षापासून विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवरून माहिती घेऊन महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. त्याने जिह्यातील दोन महिलांची अशा पध्दतीने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसऱ्या महिलेने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. कोल्हापूरसह इतर जिह्यातील पंचवीस पेक्षा अधिक महिलांची त्याने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा जुना राजवाडा पोलीस याचा कसून तपास करीत आहेत. ज्या हॉटेलमध्ये त्याने महिलांच्यावर अत्याचार केले आहे. त्या हॉटेलच्या परिसरात त्याला फिरवले जाणार आहे.