महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सक्षमांच्या तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला रौप्य,

06:23 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आशियाई पॅराक्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या शीतल देवीने येथे झालेल्या खेलो इंडिया एनटीपीसी राष्ट्रीय मानांकन तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. हरियाणाच्या एकता राणीने सुवर्णपदक पटकावले. एकता ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असून ती कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनही आहे.

Advertisement

डीडीए यमुना क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षीय शीतल देवीने शारीरिक सक्षम असणाऱ्या कनिष्ठ तिरंदाजांसमवेत भाग घेतला होता. वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम लढतीत तिला एकताकडून 138-140 असा पराभव स्वीकारावा लागला. चीनमधील हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत शीतल देवीने 2 सुवर्ण व एक रौप्य पटकावले होते. या कामगिरीची दखल घेत क्रीडा मंत्रालयाने तिला या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. जन्मापासूनच तिला दोन्ही हात नाहीत. या स्थितीला फोकोमेलिया असे म्हटले जाते. दोन्ही हात नसणारी ती पहिली व एकमेव आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाज चॅम्पियन आहे. खेलो इंडियातील कामगिरी आपल्याला भविष्यातील आव्हानांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, असे तिने म्हटले आहे.

शीतलच्या उपस्थितीमुळेच मी प्रेरित झाले होते. यापूर्वीही मी तिच्याविरुद्ध खेळले असल्याने मला थोडासा अनुभव होता. गेल्या डिसेंबरमध्ये पतियाळात झालेल्या स्पर्धेत आम्ही एकमेकीशी मुकाबला केला होता तिच्याविरुद्ध खेळताना नेहमीच प्रेरणा मिळत राहते, अशा भावना एकताने व्यक्त केल्या. एकताला 50,000 तर शीतलला 40,000 रुपयांचे बक्षीस मिळाले. ही स्पर्धा वरिष्ठ, कनिष्ठ व उपकनिष्ठ अशा तीन विभागात रिकर्व्ह व कंपाऊंड प्रकारात घेण्यात आली. यात 87 तिरंदाजांनी भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article