For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडे कालिका मंदिर सभामंडपाच्या छप्परावर पत्र्याची शेड

03:03 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कारिवडे कालिका मंदिर सभामंडपाच्या छप्परावर पत्र्याची शेड
Advertisement

मंत्री केसरकरांचे कारिवडे देवस्थान कमिटीने मानले आभार !

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिराच्या सभा मंडपाच्या छप्परावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वखर्चाने पत्र्याची शेड उभारून दिली आहे. त्यामुळे सभा मंडपाच्या गळतीचा प्रश्न मार्गी लागला असून मंत्री दीपक केसरकर यांचे श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आभार मानले आहेत. तसेच लवकरच या मंदिराच्या कळसाच्या गळती दुरुस्तीचे कामही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या मंदिराच्या सभामंडपाच्या गळतीचे काम श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव दत्ताराम गावडे, खजिनदार शुभम गावकर, सदस्य मनोहर वासकर, आलबा घाडी, लाडू जाधव, शंकर मेस्त्री, अनिल नाईक, कृष्णा ह परब, शरद परब, कृष्णा बा, परब, विलास गवळी, रवींद्र ठाकूर, शंभा खडपकर, सोनू सावंत, कारीवडे शिवसेना उपविभागप्रमुख रवी परब यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. मंदिर परिसरात स्वच्छता गृह आणि सुशोभिकरणासाठी पर्यटन विकास योजनेमधून ६ लाखाचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केला असुन लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. या मंदिराच्या सभामंडपाच्या गळतीचे काम मार्गी लागल्यामुळे तसेच मंदिर सुशोभीकरण व स्वच्छतागृहासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल देवस्थान मानकरी तसेच भाविकांनी समाधान व्यक्त करीत मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. सोमवारी ३० सप्टेंबर रोजी मंत्री दीपक केसरकर कालिका मंदिराला भेट देत या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.