मेंढ्या चोरणारी टोळी गजाआड
पन्हाळा पोलिसांची कारवाई
संशयित चंदगड-हुक्केरी-बेळगाव येथून ताब्यात
कोल्हापूर
पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील तिघांना महाराष्ट्रातील चंदगड तसेच कर्नाटकातील हुक्केरी व बेळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली. पन्हाळा-कोल्हापूरपासून चंदगडपर्यंत 35 ठिकाणी सीसीटिव्ही तपासून माग काढून ही कारवाई केली. परशुराम मारुती पवार (वय 33, रा. तुडये ता. चंदगड जि. कोल्हापूर) मोहंमद शाहिद मोहंमद गौस काकर (वय 27, काकार गल्ली बेळगाव) व मेहबूब अब्दुल मुलतानी (वय 58, रा. गुंजानहट्टी ता. हुक्केरी बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, येथील पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. तपास दरम्यान राशिवडे (ता. राधानगरी) येथे देखील मेंढ्या चोरीची कबुली त्यांनी दिली.
गत महिन्यात पन्हाळा-खोतवाडी येथील आनंदा दादु शिंदे यांच्या शेतात बसवलेल्या युवराज तानाजी गावडे (रा. माजगाव ता. पन्हाळा) यांच्या 21 मेंढ्या चोरून नेल्या होत्या. याबाबत युवराज गावडे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली. त्याचा तपास पन्हाळा पोलीस करत होते. तपासा दरम्यान तिघांची टोळी जेरबंद करत ओमानी गाडी आणि मेंढ्या विकलेले रक्कम हस्तगत केली. (एपीआय) संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कौडूभैरी, सीताराम डोईफोडे, समीर मुल्ला, रवींद्र कांबळे, गेंगजे, डमाळे, पाटील, जाधवर, बोरचाटे, वायदंडे यांनी तपास केला.