शर्वरी वाघला मिळाला मोठा चित्रपट
आयुष्मानसोबत झळकणार
बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना कौटुंबिक आणि रोमँटिक कहाण्यांना मोठ्या पडद्यावर सादर करण्यासाठी ओळखले जाते. शर्वरी वाघला आयुष्मान खुरानासोबत सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे.
बडजात्या यांना हम साथ-साथ हैं, मैंने प्यार किया आणि हम आपके हैं कौन यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी आता शर्वरीला मिळाली आहे. निरागसपणा आणि संवेदनशीलतेला प्रभावीपणे व्यक्त करण्याची शर्वरीची क्षमता पाहूनच तिची निवड करण्यात आल्याचे समजते. आयुष्मान या चित्रपटात प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आयुष्मान हा अत्यंत प्रभावी अभिनेता म्हणू ओळखला जातो. आयुष्मान आणि शर्वरी यांची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. अशात हा चित्रपट बडजात्या यांचा असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.