मराठा इन्फंट्रीमध्ये शरकत दिन
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने बुधवारी 107 व्या शरकत दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 1918 च्या मेसापोटेमिया युद्धात 114 मराठा जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण म्हणून शरकत दिनाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी मराठा सैनिकांचे कौतुक करत त्यांनी बजावलेले शौर्य आणि धाडसामुळे मराठा लाईट इन्फंट्रीचे नाव सर्वत्र असल्याचे सांगितले. तसेच बलिदान दिलेल्या शूर जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. रेजिमेंटमध्ये सौहार्द आणि बंधुत्वाचे दर्शन घडविणाऱ्या बडाखानाने कार्यक्रमाची सांगता झाली. मराठा सैनिकांच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर प्रदेशातील सैन्यांच्या विविध परंपरा सांस्कृतिक कार्यक्रमांतून सादर करण्यात आल्या.