For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शर्माजी की बेटी’ लवकरच झळकणार

06:31 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शर्माजी की बेटी’ लवकरच झळकणार
Advertisement

ताहिरा कश्यपकडून दिग्दर्शन

Advertisement

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत महिलाकेंद्रीत अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. यात वेगवेगळ्या कलाकारांसोबत नव्या कहाण्या पहायला मिळाल्या आहेत. आता या यादीत आणखी एका चित्रपटाचे नाव सामील झाले आहे. ‘शर्माजी की बेटी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच्या निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Advertisement

सैयामी खेर, साक्षी तंवर, दिव्या दत्त हे कलाकार असलेला चिर्घ्पट आता प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 28 जून रोजी हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे. अप्लॉस एंटरटेन्मेंटकडून सादर आणि एलिप्सिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शनकडून निर्मित या चित्रपटाची कहाणी ताहिरानेच लिहिली आहे.

शर्माजी की बेटी या चित्रपटाची कहाणी पाच महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट स्वप्नांच्या पूर्ततेसाठी समोर येणाऱ्या आव्हानांचे समर्पक चित्र प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. अरिस्ता मेहता, शारिब हाशमी, परवीन आणि वंशिका तपारिया हे कलाकार देखील यात दिसून येतील.

Advertisement
Tags :

.