युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्सचे समभाग 235 वर सुचीबद्ध
कंपनीचा आयपीओ 6 ते 8 ऑगस्टदरम्यान होता खुला : फर्स्टक्रायचे समभाग देखील 651 वर
मुंबई :
युनिकॉमर्स ई सोल्यूशन्स लिमिटेड आणि फर्स्टव्र्राय आणि ब्रेनीबीस सोल्यूशन लिमिटेड यांचे समभाग बाजारात सुचीबद्ध झाले आहेत. युनिकॉमर्स ई सोल्यूशन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 235 वर सूचीबद्ध झाले. 108 ही इश्यू किमत होती. त्यापेक्षा 117.59 टक्के अधिक समभाग वाढले आहेत. कंपनीचा समभाग बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर 230 वर सूचीबद्ध झाला, शेअर इश्यू किंमतीपासून 112.96 टक्क्यांनी वाढीव राहिला. दरम्यान, फर्स्ट क्राय मूळ कंपनी ब्रेनीबीस सोल्यूशन शेअर एनएसईवर 651 वर सूचीबद्ध झाला होता, ज्याची 465 इश्यू किमत होती. म्हणजे समभागाने 40 टक्के इतका परतावा दिला आहे.
फर्स्ट क्राय समभाग बीएसई वर 625 वर 34.41 टक्क्यांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध झाला. दोन्ही कंपन्यांचे आयपीओ 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान खुले होते. युनिकॉमर्स ई सोल्यूशन्सचा आयपीओ तीन दिवसांत 168.35 पट ओव्हरसबक्राइब झाला होता. रिटेल श्रेणीमध्ये इश्यू 130.99 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदारमध्ये 138.75 पट आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 252.46 पट सबस्क्राइब झाला आहे.