For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा कन्सल्टन्सीचा समभाग तेजीत

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
टाटा कन्सल्टन्सीचा समभाग तेजीत
Advertisement

मुंबई : टाटा समूहातील आयटी सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी चांगलाच वधारताना दिसून आला आहे. टाटा कन्सल्टन्सीचा समभाग गुरुवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 4 टक्के वाढत 3523 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीने 17 हजार कोटींच्या शेअर बायबॅकची घोषणा केली असून त्याकरीता 25 नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख असणार आहे. गेल्या 6 वर्षात पाचव्यांदा शेअर बायबॅकची योजना कंपनीने राबवली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.