For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिफ्यूजन इंजिनिअर्सचे समभाग सुचीबद्ध

10:00 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिफ्यूजन इंजिनिअर्सचे समभाग सुचीबद्ध
Advertisement

आयपीओ 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांसाठी होता खुला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

डिफ्यूजन इंजिनियर्स लिमिटेडचे समभाग शेअरबाजारात 15 टक्के तेजीसह खुले झाले. डिफ्यूजन इंजिनियर्स लिमिटेडचे समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 193 वर सूचीबद्ध झाले, इश्यू किमतीपेक्षा 15.17 टक्क्यांनी हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज  वर 188 वर सूचीबद्ध झाला, जो त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 11.90 टक्क्यांनी वाढला. या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची इश्यू किंमत 168 होती.

Advertisement

आयपीओ 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. तीन ट्रेडिंग दिवसात आयपीओ एकूण 114.5 पट सबक्राइब झाला.

यासाठी, कंपनीने 158 कोटी किमतीचे 9,405,000 ताजे शेअर्स जारी केले. कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांनी ऑफर फॉर सेलद्वारे एकही शेअर विकला नाही. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 845 समभागांसाठी बोली लावू शकतात. 35 टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता. कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी इश्यू 50 टक्के राखीव ठेवला आहे.

डिफ्यूजन इंजिनियर्स लिमिटेडची स्थापना 1982 मध्ये झाली. कंपनी वेल्डिंगशी संबंधित विविध सेवा पुरवते आणि अवजड उपकरणे तयार करते.

Advertisement
Tags :

.