सुदर्शन केमिकलचा समभाग उच्चांकावर
मुंबई :
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांचा समभाग शुक्रवारी इंट्राडे दरम्यान 20 टक्के इतका दमदार वाढला होता. या योगे कंपनीच्या समभागाच्या भावाने 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तर प्राप्त केला होता. जागतिक स्तरावरील जर्मनीतील ह्युबॅक ग्रुपचे अधिग्रहण करण्याची घोषणा केल्यानंतर सुदर्शन केमिकमलच्या समाभागावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. सुदर्शन केमिकल कंपनीने ह्युबॅक ग्रुपसोबत अधिग्रहणासंदर्भातला करार केला आहे. सदरच्या अधिग्रहणासाठी सुदर्शन केमिकमलने 1 हजार 180 कोटी रुपये मोजले असल्याचे सांगितले जात आहे. सदरची ह्युबॅक ग्रुप कंपनी स्पेशालिटी केमिकल बनविण्यासाठी मातब्बर मानली जाते. हे अधिग्रहण सुदर्शन कंपनी पूर्णपणे रोख रक्कम देऊन पूर्ण करणार असल्याचे समजते. पुढील तीन ते चार महिन्यामध्ये ही अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीचे समभागधारक व नियामक यांच्याकडून सदरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात येणार आहे. ह्युबॅक ग्रुप ही जवळपास 200 वर्षांपासून रसायन उद्योगामध्ये कार्यरत आहे.