For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेल, वायु क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले

06:22 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेल  वायु क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले
Advertisement

मुंबई :

Advertisement

शेअरबाजारात मंगळवारी तेल कंपन्यांचे समभाग तेजी राखून होते. यामध्ये ओएनजीसीचे समभाग तर 5 वर्षानंतर उच्चांकावर कार्यरत होताना दिसले. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचे समभाग मंगळवारच्या सत्रात इंट्रा डे दरम्यान 6 टक्के इतके वधारले होते. या कंपन्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत दमदार नफ्यातील कामगिरी नोंदवल्याचे निमित्त होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समभागांवर दिसून आला. ऑइल अँड नॅचरल गॅसचा समभागाने 2 टक्के वाढत 5 वर्षानंतर 317 या भावावर कार्यरत राहात उच्चांकी स्तर गाठला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.