महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीकडून सत्ता काढून घ्यायची हे जनतेनं ठरवलयं! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांची स्पष्टोक्ती

04:49 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

आमदार गेलेत तरी कार्यकर्ते माझ्यासोबतच; राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा

कोल्हापूर प्रतिनिधी

आमदारांनी साथ सोडली म्हणून चिंता करू नका. मी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असून सर्वसामान्य जनतेचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार गेले असले तरी तळागाळातील जनेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. राज्यातील सत्ता महायुतीकडून काढून घ्यायची हे जनतेने ठरवले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांसाठी प्रगतीचे आणि विकासाचे नवीन राज्य येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तालुकानिहाय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत आजमावून घेत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे, रोहित आर. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, रामराजे कुपेकर, माजी आमदार राजीव आवळे, पद्मजा तिवले आदी उपस्थित होते. अनिल कदम यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
यावेळी पवार म्हणाले, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील याचा अद्याप निर्णय झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदीने महायुतीविरोधात लढल्यामुळे राज्यात ‘मविआ’चे 31 खासदार झाले. त्यामुळे विधानसभा निवडणूकही एकजुटीने लढविण्याचा निर्णय घेतला असून जागा वाटपाबाबत लवकरच आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांबरोबरच ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाला धक्का देणारे महायुतीचे सरकार आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीमध्येसुद्धा या सरकारने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील शिवप्रेमी जनता अस्वस्थ आहे असे त्यांनी नमूद केले.

Advertisement

सोडून गेलेले 54 आमदार पडले
1980 साली माझ्या पक्षाचे 60 आमदार निवडून आले. पण मी दहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यापैकी 54 आमदार सोडून गेले. तरीही माझ्यासोबत असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील निवडणुकीत तब्बल 69 उमेदवार निवडून आणले. यावेळी माझी साथ सोडून गेलेले 54 आमदार पडले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्यासोबत असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असेही पवार म्हणाले.

बाजीराव खाडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी आणि लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले बाजीराव खाडे यांनी बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आपण जो उमेदवार द्याल तो निवडून आणू
शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जिह्यातील बारा तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद पवार जो उमेदवार देतील, त्यांना निवडून आणण्यासाठी ‘जीवाचे रान’ करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीला पाच जागा घ्याव्यात
राधानगरी, चंदगड आणि कागल या तीन मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा नैसर्गिक हक्क आहे. याशिवाय इचलकरंजी आणि कोल्हापूर उत्तर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावेत. इचलकरंजीतून मदन कारंडे आणि कोल्हापूर उत्तरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी द्यावी. अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच हातकणंगले मतदारसंघ मिळाला तर तेथे माजी आमदार राजीव आवळे यांना उमेदवारी द्यावी, असेही कार्यकत्dर्यांनी सूचवले.

जिल्हा नेतृत्वाने आम्हाला दडपून ठेवले, अन्याय केला
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. शरद पवार हेच आमचे नेते म्हणून गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कार्यरत आहे. पण या काळात जिल्हा नेतृत्वाने आम्हाला सन्मानाची वागणूक दिली नाही. अन्याय केला. आम्हाला दडपूण ठेवण्याचे काम केले. तरीही आम्ही पक्षासाठी काम करत राहिलो. ज्यांना आपण सर्वांनी मोठे केले, त्यांनीच आपल्याशी गद्दारी केली असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आळवला.

अंडरस्टँडिंगचे राजकारण धोकादायक
कागलमध्ये माझ्या मतदारसंघात तू लक्ष घालू नको, तुझ्या मतदारसंघात मी लक्ष घालत नाही असे अंडरस्टँडिंगचे राजकारण विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. हे नेते सहकाराच्या राजकारणातून एकत्र असल्यामुळे तो धोका असून महाविकास आघाडीसाठी ते घातक आहे. हा प्रकार आपण योग्य वेळीच रोखावा अशी विनंती अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.

Advertisement
Tags :
Government Rest HouseNCPsharad pawar
Next Article