संमेलन स्थळी शरद पवारांनी केली पाहाणी
दिल्ली
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होणार आहे. साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणे यांच्यातर्फे ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीतील तालकाटोरा स्टेडीयम येथे केले आहे.
या पार्श्वभूमीवर संमेलन स्थळी जाऊन शरद पवार यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणाची माहिती दिली. या संमेलनच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलेली आहे. कार्यक्रमाला पंतप्रधान नक्की उपस्थित राहतील अशी मला खात्री आहे असे भाष्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केले. याविषयी पंतप्रधान कार्यालयाशी बोलणे झाल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी संमेलन स्थळी सुविधांचा आढावा शरद पवार यांनी घेतला.
संमेल्लनात आसनव्यवस्था, कवीकट्टा, पुस्तक प्रदर्शन स्थळ, प्रकाशकांसाठीचे विक्रीदालन आदींची पाहाणी केली. या संमेलनाचे नियोजन काटेकोरपणे करावे, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अतुल बोकरिया, प्रदीप पाटील, लेशपाल जवळगे आदी उपस्थित होते.