For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी! राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा

07:25 PM Oct 19, 2023 IST | Abhijeet Khandekar
शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी  राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा
Sharad Pawar contest Madha
Advertisement

अजित पवार यांच्यासोबतच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मतदारसंघ अशी खास ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी केली आहे. 2009 ते 2014 या काळात खासदार असलेले शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व केले होते.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकसभेसाठीच्या आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील 48 पैकी 15 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची ओळख करण्यासाठी पवार यांनी दोन दिवसीय बैठक बोलावली होती. बैठकिच्या पहिल्या दिवशी बारामती, माढा, कोल्हापूर, शिरूर, सातारा, हातकणंगले आणि रावेर या सात लोकसभेच्या मतदारसंघावर आणि त्याठिकाणच्या इच्छुक उमेदवारांवर चर्चा झाली.

दरम्यान, माढा येथील चर्चेदरम्यान मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांनी माढ्यातूनच निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. बैठकीनंतर "कार्यकर्त्यांचे मत आहे कि, शरद पवार साहेबांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. आमच्या विनंतीला त्यांनी सहमती दर्शवली तर आम्ही निश्चितपणे ही जागा जिंकू." असेही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले. "पवारसाहेबांनी मागणीला अजून तरी प्रतिसाद दिलेला नाही. मीटिंगमध्ये उमेदवारीबद्दल ते कधीही काहीही बोलत नाहीत. कारण अशा निर्णयांसाठी खूप विचारविनिमय आवश्यक आहे. जे शेवटच्या निर्णयापर्यंत सुरूच राहते.” असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार मार्च 2020 मध्ये राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. 2019 मध्ये त्यांनी माढा येथून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण नंतर पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या आग्रहामुळे त्यांनी नाव मागे घेतले. शरद पवार त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होते पण पवार कुटुंबातील दोनच सदस्यांनी निवडणूक लढवावी त्यापैकी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरी उमेदवारी पार्थ पवार यांची असेल. असा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. माढा हा लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे आहेत.

Advertisement
Tags :

.