महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शांतीनिकेतन कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत सुयश

10:30 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पदवी पूर्व महाविद्यालयाच्या खानापूर येथील विद्यार्थ्यांनी खानापूर तालुका मर्यादित पदवी पूर्व महाविद्यालयांच्या क्रीडास्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सांघिक खेळासह वैयक्तिक खेळातही महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपली चमक दाखविली. मुलींच्या वैयक्तिक स्पर्धेत उंच उडीमध्ये प्राची पाटील प्रथम क्रमांक, भाला फेकमध्ये अंजली पाटील प्रथम क्रमांक, हातोडा फेकमध्ये सानिका पाटील प्रथम क्रमांक व कुमारी प्राजक्ता वालेकर तिसरा क्रमांक पटकाविला.

Advertisement

तर मुलांच्या स्पर्धेत 4×100 मी. रिले स्पर्धेत प्रथमेश राजगोळकर, प्रल्हाद खानापूरकर, मंजुनाथ निकम, ओंकार गावडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडीतमध्ये प्रल्हाद खानापूरकर दुसरा क्रमांक, उंच उडीमध्ये मंजुनाथ निकमचा तिसरा क्रमांक, हातोडा फेकमध्ये प्रथमेश मेलगे तिसरा क्रमांक मिळविला. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर विद्याभारती राज्य पातळीवरील वैयक्तिक स्पर्धा बिदर व मंगलोरमध्ये आयोजित केल्या होत्या. श्री महालक्ष्मी सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, सचिव आर. एस. पाटील व संचालक वर्ग यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रा. सुवर्णा निलजकर व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article