महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘शांतला’ आश्लेषा मुख्य भूमिकेत

06:18 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकनृत्यप्रकारावर आधारित चित्रपट

Advertisement

लवकरच ‘शांतला’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार असून हा कल्चरल ड्रामाने युक्त असणार आहे. ‘शांतला’ हा चित्रपट कर्नाटकातील स्थानिक नृत्यप्रकारावर आधारित असल्याचे समजते. या चित्रटपात आश्लेषा ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. आश्लेषा यापूर्वी ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. आश्लेषा आता ‘शांतला’मध्ये स्वत:च्या अभिनयाची कला दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. आश्लेषाने ज्याप्रकारे या चित्रपटात भूमिका साकारली आहे ते पाहता तिच्या अभिनयाला मोठी दाद मिळणार आहे. हा चित्रपट आगामी काळात एक उदाहरण म्हणून आठवणीत राहणार असल्याचे महेश भट्ट यांनी म्हटले आहे. सिस्सू पेडिरेड्डी यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article