For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शनाया-विक्रांतने सुरू केले चित्रिकरण

06:22 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शनाया विक्रांतने सुरू केले चित्रिकरण
Advertisement

देहरादूनमध्ये जमली चित्रपटाची टीम

Advertisement

अभिनेता विक्रांत मैसीने सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याची पोस्ट केली होती. परंतु यानंतर त्याने खुलासा देखील केला आहे. याचदरम्यान विक्रांतने आता नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.

विक्रांत मैसीचे नव्या वर्षात दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील एका चित्रपटाचे नाव ‘आंखो की  गुस्ताखियां’ आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शनाया कपूर दिसून येणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण आता देहरादूनमध्ये सुरू करण्यात आले आहे.

Advertisement

मी केवळ अभिनयच करू शकतो, यातूनच मला सर्वकाही मिळू शकते. माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था सध्या ठीक नसल्यानेच मी ब्रेक घेऊ इच्छितो. मी काही चांगले करू इच्छितो. माझ्या सोशल मीडियावरील पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी स्वत:चा परिवार आणि आरोग्यावर लक्ष देण्यासाठी काही वेळ काढू इच्छित असल्याचे विक्रांतने म्हटले आहे.

मागील काही वर्षे माझ्यासाठी अदभूत राहिली आहेत. मला समर्थन देणाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो. परंतु कारकीर्द पुढे जाताच मला एक पिता, पती, मुलगा आणि अभिनेता म्हणुन पुन्हा स्वत:ला घडविण्याची वेळ आली असल्याची जाणीव झाली असे विक्रांतने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.