‘नई नवेली’मध्ये क्रीति सेनॉन
आनंद एल रॉय यांच्याकडून निर्मिती
क्रीति सेनॉनने अलिकडेच ‘दो पत्ती’द्वारे निर्माती म्हणून पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. आता अभिनेत्री क्रीति हे आनंद एल. राय यांच्याकडून निर्मित होणाऱ्या एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसून येणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘नई नवेली’ असून त्याची निर्मिती राय यांचे बॅनर कलर येलो प्रॉडक्शन्स अंतर्गत केली जाणार आहे. हा चित्रपट ‘तेरे इश्क में’वर काम केल्यावर क्रीति सेनॉन आणि आनंद एल राय यांच्यातील भागीदारीचे प्रतीक असणार आहे.
नई नवेली या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. क्रीति सेनॉन ही आनंद एल. राय यांच्यासोबत या चित्रपटासंबंधी विस्तृत चर्चा करत असल्याचे समजते. नई नवेली हा चित्रपट लोकप्रिय शैलीत एका नव्या स्वरुपात सादर केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप समोर आलेले नाही.
नई नवेलीसोबत आनंद एल. राय हे तनु वेड्स मनु फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची तयारी करत आहेत. चित्रपटात कंगना रनौत आणि आर. माधवन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.