कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शनायाला मिळाला बिगबजेट चित्रपट

06:13 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजय कपूरची कन्या शनाया कपूर लवकरच तू या मैं या चित्रपटात आदर्श गौरवसोबत झळकणार आहे. याचबरोबर शनायाने आणखी दोन चित्रपट स्वीकारले असून यातील एका चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे. शनाया ही ‘स्टुडंट ऑफ द ईयर 3’मध्ये काम करणार आहे.

Advertisement

Advertisement

शनायाने स्वत:च्या कारकीर्दीच्या प्रारंभीच दुहेरी भूमिका साकारण्याचे आव्हान स्वीकारले आहे. शनाया कपूरला या भूमिकांद्वारे स्वत:च्या अभिनयाची क्षमता दाखवून देता येणार आहे. स्टुडंट ऑफ द ईयर 3 हा चित्रपट तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्टुडंट ऑफ द ईयर ही फ्रँचाइजी यापूर्वी अनेक स्टार किड्ससाठी लाभदायक ठरली आहे. याच फ्रँचाइजीमध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांनीही काम केले आहे.

शनाया याचबरोबर अभय वर्मासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. अभय वर्माला ‘मुंज्या’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर स्वत:च्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या तुलनेत शनायाने मागील काही काळात मोठी झेप घेतल्याचे मानले जात आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article